‘भारतमाते’च्या पदराखाली लपण्याचा अदानी समूहाचा प्रयत्न म्हणजे ‘मेरे पास माँ हैं’ या ‘दीवार’ चित्रपटातील बचावात्मक पवित्र्याचाच एक प्रकार आहे!

सरकारचा वरदहस्त लाभल्यामुळे स्वप्नातीत श्रीमंत झालेल्या अदानी यांना आपली प्रगती अपरिहार्य आहे, याचा अंदाज पूर्वीच आला होता. आपण ज्याला स्पर्श करू त्याचे सोने होणार, हा आत्मविश्वास म्हणजे त्यांच्या गर्वाचीच व्याख्या. आपल्या राजकीय पाठीराख्यांची सत्ता राष्ट्रापल्याड चालत नाही आणि याच भागात एखादा शॉर्ट सेलर आपलं पितळ उघडं पाडण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत बसलेला असेल, याचा कदाचित त्यांना विसर पडला.......